Share

पश्या मला तुला कडकडून मिठी मारायचीय; धर्मवीर पाहून संतोष जुवेकरची आई झाली भावूक

लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर एक चित्रपट आला आहे. धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे यांची लोकप्रियताही समोर आली आहे. (santosh juvekar mother on prasad oak)

१३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खुप धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटावर अनेकजण वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहे. आता अभिनेता संतोष जुवेकरच्या आईने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. आता त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या आईने धर्मवीर चित्रपट बघून आल्याचे लक्षात येते. यावेळी फोन त्याच्या आईच्या हातात असून त्यावर ती धर्मवीरचे पोस्ट बघताना दिसून येत आहे.

प्रसादने इतकं सुंदर काम केलंय की माझे डोळे भरुन आले. आज प्रत्यक्षात आनंद दिघेच आले की काय असं वाटलं. मी प्रत्यक्ष आनंद दिघेंना बघितलं आहे. त्यामुळे तो पुर्णपणे त्यांच्या सारखाच दिसत होता. त्याच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले ते खरोखरच आलं. माझेही डोळे तितकेच वाहत होते, असे संतोष जुवेकरच्या आईने म्हटलं आहे.

संतोष, प्रसादने इतकं सुंदर काम केलंय, असं कोणीही केलेलं नाही. संतोष तु खरंच चित्रपट पाहायला जा. मी परत एकदा मैत्रिणींना घेऊन जाऊन हा चित्रपट बघणार आहे. प्रसादला मंजूने साफ साथ दिली आहे आणि ज्याच्यामागे बायको उभी आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. चित्रपटात नाव ठेवण्यासारखं काहीही नाही, असेही संतोषच्या आईने म्हटलं आहे.

तसेचं प्रसाद मला इतकंच सांगायचंय की मला तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा भेटायचं आहे. त्यावेळी तुला कडकडून मिठी मारायची आहे. खरंच पश्या तु खुप मस्त काम केलंय. आनंद दिघेंचे नाव मिळणं म्हणजे सात जन्म, सात पिढ्या नाही मिळणार एवढं तु त्यांचं नाव मिळवलंय. तु भाग्यवान आहे. प्रसाद लवकरच भेट मला, असेही संतोषच्या आईने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांवर टिका करताना दिपाली सय्यदची जीभ घसरली; म्हणाली, टरबुज्या, भोंग्या….
अखेर ताजमहालच्या तळघरातील २२ बंद खोल्यांचे फोटो जारी, ASI ने २०२२ मध्ये ‘या’ कारणास्तव उघडले लॉक
हनुमानाबद्दल प्रश्न विचारताच नवनीत राणांची झाली पंचाईत, VIDEO तुफान व्हायरल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now