शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गद्दारी करणाऱ्यांविरोधात आता शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदे गटाला समर्थन दिलेल्या नेत्यांची शिवसेनेने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. गद्दारी करणाऱ्या संतोष बांगर यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली होती. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार बांगर हे शिंदे गटात सामील झाले. यामुळे आता शिवसेनेकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हकालपट्टीबाबत खुद्द बांगर यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
बांगर यांनी म्हंटलं आहे की, ‘मला अद्याप शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे कोणतेही पत्र पोहचलेले नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती केली होती. याचबरोबर मला मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली सेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही.’
तसेच पुढे बोलताना बांगर यांनी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. ‘५५ पैकी आमदार आमच्या ओरिजन शिवसेनेत आहेत. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन काढलेले नाही,’ असं बांगर यांनी म्हंटलं आहे. मला आजही मातोश्रीबद्दल, उद्धव ठाकरेंबाबत आदर असल्याच बांगर यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, काल बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेने मोठी कारवाई केली. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
आज फैसला! नरहरी झिरवाळांच्या उत्तरानं शिंदे सरकार अडचणीत येणार; मुख्यमंत्र्यांना सोडावं लागणार पद?
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
…म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; शरद पवारांनी केला मोठा खुलासा
“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल