आमदार संतोष बांगरांची दादागिरी; थेट प्राचार्यांनाच केली मारहाण, धक्कादायक कारण आले समोर

शिंदे गटातील आमदार त्यांच्या विधानांमुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे तर त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे वादातही अडकतात. आता पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले आहे. त्यांनी आता एका प्राचार्यांना मारहाण केली आहे.

संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांना मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे संतोष बांगर यांची दादागिरी पुन्हा चर्चेत आली आहे. अनेकजण संतोष बांगर यांच्यावर टीका देखील करत आहे.

संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहे. त्यांनी हिंगोलीतील तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांना मारहाण केली आहे. अशोक उपाध्याय असे त्या प्राचार्यांचे नाव आहे. त्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. त्यानंतर या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशोक उपाध्याय हे महिला प्राध्यापकांना त्रास देत होते. त्यामुळे संतोष बांगर यांनी त्यांना मारहाण केल्याचा समोर आले आहे. प्राचार्य महिला प्राध्यापकांना त्रास देत होते अशी तक्रार संतोष बांगर यांच्याकडे आली होती. त्यामुळे संतापलेल्या बांगर यांनी थेट प्राचार्यांना चोप दिला आहे.

संतोष आमदार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. ते दादागिरी करत मारहाण करण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे ते वादात सापडताना दिसत आहे. विरोधी पक्षातील नेते सुद्धा यामुळे त्यांच्यावर टीका करत आहे.

याआधी संतोष बांगर यांनी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा आरोप केला होता आणि त्याला मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी एका कृषी अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यामुळे सुद्धा ते चर्चे आले होते.

महत्वाच्या बातम्या-
‘हरलो असो तरी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच’; वाद शांत होताच सिकंदरने पुन्हा ठोकला शड्डू
‘मैं अब्बा का सपना पूरा कर रहा हूं’, नंबर १ बनताच सिराज भावूक, वडीलांच्या आठवणीत अश्रू अनावर
सामन्याच्या एक दिवस आधी अष्टपैलू रवींद्र जडेजाची अचानक संघात एन्ट्री, कर्णधारपदही मिळाले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण