आयपीएल हे असे व्यासपीठ आहे ज्याने टीम इंडियाला अनेक मोठे खेळाडू दिले आहेत. आयपीएलमुळे आज टीम इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणाहून ४ ते ५ खेळाडू आहेत, अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवणे खूप कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खेळाडूबद्दल सांगणार आहोत, ज्याने संघात संधी न मिळाल्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता.
वयाच्या १८ व्या वर्षी एका दमदार खेळाडूने आयपीएलमध्ये पाऊल ठेवले होते, हा खेळाडू आजच्या काळातही आयपीएल संघाचा कर्णधार आहे. आम्ही बोलत आहोत धमाकेदार फलंदाज संजू सॅमसनबद्दल. संजू अशा खेळाडूंपैकी एक आहे जो संपूर्ण सामना स्वत:च्या जोरावर फिरवू शकतो.
त्याने अलीकडेच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील संघर्ष आणि भारतीय संघातील प्रवेशाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. संजू सॅमसनने वयाच्या 19 व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले, परंतु तो आपली छाप सोडू शकला नाही. पदार्पण केल्यानंतर त्याला 5 वर्षे संधी मिळाली नाही, या काळात संजू सॅमसन पूर्णपणे तुटला होता.
त्याला केरळ संघानेही वगळले होते. खराब कामगिरीमुळे संजू सॅमसनने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. संजू सॅमसनने अलीकडेच ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, एकदा माझं डोकं फिरलं आणि मी बॅट फेकून निघून गेलो. त्यावेळी मी सीसीआय स्टेडियममध्ये होतो.
संजू पुढे म्हणाला, मला असं करताना कोणी पाहिले नाही. मी तेव्हा क्रिकेट सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. मी परत आलो तेव्हा माझी बॅट तुटलेली होती. त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. ती बॅट खरंच खुप चांगली होती. आता जेव्हा मी त्या प्रसंगाबद्दल विचार करतो तेव्हा मला हसू येतं.
आयपीएल 2022 मध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली या मोसमात संघाने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली 14 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले. पण अंतिम सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव स्विकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, भडकलेले वसंत मोरे म्हणाले; त्याचा बाप…
लोकं शिव्या देत आहेत पण.., दयाबेनच्या पुनरागमनामुळे संतप्त चाहत्यांवर असित मोदींनी सोडले मौन
सुनील गावसकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आधी मला सचिन तेंडूलकर आणि आता उमरान मलिक..
…तर माझा अर्ज १०० टक्के जाणार, आमदार-खासदारांशी चर्चा सुरू; बिचुकले लढवणार राष्ट्रपती निवडणुक