प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या मदतीचे अनेक किस्से आहेत. त्यांनी अनेक कंपन्यांना बुडताना वाचवले आहे. आता असाच एक किस्सा समोर आला आहे. ज्यामुळे रतन टाटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (sanjiv kaul share ratan tata incident)
क्रिस कॅपिटलचे पार्टनर संजीव कौल यांनी म्हटले आहे की, भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या एका भेटीमुळे भारतातील ब्रेन ड्रेन थांबला आणि त्यांना स्टार्टअप सुरू करण्यात मदत झाली होती. २००४ मधील जेट एअरवेजच्या फ्लाइटची घटना सांगताना संजीव कौल यांनी एका लिंक्डिन पोस्टमध्ये रतन टाटांसोबत झालेल्या मुलाखतीत नक्की काय घडलं होतं ते सांगितलं आहे.
अॅडविनस थेरप्युटिक्स ही एक कंपनी आहे. या कंपनीचा प्रमोटर टाटा समूह आहे. मात्र, या स्टार्टअपला टाटांकडून निधी कसा मिळाला याबाबत संजीव कौल यांनी सांगितले आहे. संजीव यांनी म्हटले आहे की, २००४ मध्ये ते जेट एअरवेजच्या फ्लाइटने मुंबईहून दिल्लीला येत होते. मुंबईत एका नाविन्यपूर्ण स्टार्टअपला निधी देण्याच्या संदर्भात ते एका मोठ्या उद्योगपतीला भेटायला आले होते पण त्यांना निधी मिळाला नव्हता.
त्यानंतर ते विमानात आपल्या सीट २ एफ वर बसले होते आणि कुठे चूक झाली हे पाहण्यासाठी PPT पाहत होते, तेव्हा अचानक संपुर्ण विमानात शांतता पसरली होती. त्यावेळी रतन टाटा त्यांच्या शेजारी २ डी सीटवर येऊन बसले. आधी ते स्तब्ध झाले पण नंतर त्यांचं लक्ष पुन्हा लॅपटॉपकडं गेलं.
कौल पुढे म्हणाले की, उड्डाण केल्यानंतर चुकून त्याच्या टायवर ज्युस सांडला आणि हे पाहून रतन टाटा यांनी लगेचच रुमाल देऊन ज्युस साफ करण्यास मदत केली. यानंतर कौल यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे टाटांनी पाहिले. त्यांनी संजीव कौल यांना याचे कारण विचारले.
कौल यांनी सांगितले की, त्यांना २ शास्त्रज्ञांसह एक स्टार्टअप सुरू करायचा होता आणि त्यासाठी त्यांना निधीची गरज होती. त्यामुळे ते मुंबईत आले होते. तसेच त्यांनी आता सर्व पर्याय आजमावले आहेत आणि त्यांना अजून निधी मिळू शकलेला नाही.
कौल यांनी टाटा यांना सांगितले की ते दोन्ही शास्त्रज्ञ आता अमेरिकेत परतण्याची तयारी करत आहेत. यावर टाटांनी त्यांना त्यांचा नंबर विचारला आणि म्हणाले की लवकरच त्यांना टाटा समूहातून कोणीतरी कॉल करेल. त्याच रात्री कौल यांच्याशी टाटांनी संपर्क साधला आणि दोन शास्त्रज्ञांच्या भेटीसाठी त्यांना मुंबईला बोलावले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन दिले आणि सर्व काही ठीक झाले.
रतन टाटा हे देशभक्त असल्याचे सांगताना कौल म्हणाले की, भारतात दोन शास्त्रज्ञांना संधी मिळायला हवी हे एका व्यक्तीच्या लक्षात आल्याने हे सर्व शक्य झाले. देशभक्त रतन टाटा यांनी ब्रेन ड्रेन थांबवण्यास मदत केली. अॅडविनसने गेल्या दशकात जगभरातील ५० शास्त्रज्ञांना संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ही आहे जगातील सगळ्यात स्ट्रॉंग बिअर, महागड्या दारूची नशाची पडेल फिकी, एक घोट घेतला तरी..
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
ज्याने आईमुळे १०० मुलांची केली हत्या त्या सिरीअल किलरची कहाणी दिसणार मोठ्या पडद्यावर