Share

अंधारे सगळ्यांना माझा भाऊ म्हणतात पण त्या बाईने काय काय लफडी केली…; शिंदेगटाने आता सगळंच काढलं

sushma adhare

Sushma Andhare: सुषमा अंधारे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. सुषमा अंधारे शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टिकास्त्र सोडत असतात. त्यामुळे नेहमीच आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगल्याचे चित्र पाहायला मिळत. नुकताच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना तोल ढासळला आहे.

शिवसेनेचे दोन गट पडले आणि दोन्ही गटांत सातत्याने टीकेची तोफ उडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’ सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे विविध मतदार संघात जात आहेत. तसेच त्या सध्या महाराष्ट्रात दौर्‍यावर आहेत.

संजय शिरसाट यांनी खालच्या पातळीवर जाऊन अंधारे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे सध्या हा विषय राजकीय वर्तुळात धुडगूस घालत आहे. शिरसाट म्हणाले की, सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहित… छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलताना शिरसाट यांची जीभ घसरली.

तसेच, अंबादास दानवेनी मला फोन केला होता. ते म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता सुषमा अंधारे यांनी मौन सोडले आहे.

संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या चांगलीच जुंपली आहे. सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांना फेसबुक पोस्ट माध्यमातून सडेतोड प्रतिउत्तर दिला आहे. संजय शिरसाट यांनी माझ्याबद्दल सुमार विधान केला आहे. त्यांच्या लेखी बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसमोर आला आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांचा समाचार घेतला आहे.

तसेच, संपत्तीची धुंदी असलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. त्याचवेळी आजची भाषा ऐकल्यावर लक्षात आले भाऊ म्हणून घ्यायला सुध्दा लायकी लागते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या
मेहुण्याची चौकशी बंद करण्यासाठीच ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; समोर आला मोठा गौप्यस्फोट
आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर; 18 एप्रिलपासून ‘या’ देशात सुरू होणार सामने
महाराष्ट्रात लागला नवीन किल्ल्याचा शोध; बांधकामाचे अवशेष सापडले; सॅटेलाइट इमेजही निघाल्या

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now