मंत्रिपद मिळवण्यासाठी बंडखोर आमदारांमध्ये रस्सीखेच, १२ लक्झरी बस घेऊन मुंबईला रवाना

शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर पडले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. (sanjay shirsath going to mumbai)

मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र अजूनही झालेला नाहीये. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांमध्ये आता जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे. बंडखोरी करणारे आमदार संजय शिरसाठ हे आता शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. पण ते बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. त्यानंतर आता ते आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आपण मुंबईला जात असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले आहे. त्यांचा मुलगा हा नगरसेवक आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी संजय शिरसाठ शक्तीप्रदर्शन करताय अशी चर्चा सध्या शहरातील लोकांमध्ये सुरु आहे.

कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी १२ लक्झरी बस बुक केल्या आहे. तर काही छोट्या गाड्या मुंबईच्या दिशेने आधीच रवाना झाल्या आहे. कार्यकर्त्यांसाठी १२ लक्सरी बसेसचा ताफा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आमदार संजय शिरसाठ हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. शिंदे जेव्हा सुरतला गेले होते, तेव्हाही संजय शिरसाठ त्यांच्यासोबत होते. त्यानंतर जेव्हा राज्यात नवीन सरकार स्थापन झाले तेव्हा ते औरंगाबादमध्ये आले होते.

तसेच दोन दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेने जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनीही एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केलं होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी आता आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्राध्यक्षांना सांगा मला ऑफिसमध्ये मॅडम नाही, सर म्हणतात; कंगनाच्या ‘इमर्जंसी’चा टीझर रिलीज
आलिया भट्टने ‘इतक्या’ कमी वयात केला होता आपला पहिला किस, वाचून बसेल आश्चरार्याचा धक्का
शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, परभणीच्या खासदारांची पदाधिकाऱ्यांसोबत थेट मातोश्रीवर एंट्री