Share

राजकारणात भूकंप! शिवसेना मविआतून बाहेर पडणार; स्वतः राऊतांनीच सांगीतले कारण

Sanjay Raut,

Politics: राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आता ते या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, सावरकरांबद्दलचे चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते खपवून घेणार नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या यात्रेत वीर सावरकरांचा मुद्दा मांडण्याची गरज नव्हती.

तसेच, हा मुद्दा उपस्थित करून केवळ शिवसेनाच आश्चर्यचकित होत नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे मोठे विधान राऊत यांनी केले आहे. त्याचवेळी, ऐतिहासिक काळात काय घडले आणि काय घडले नाही यापेक्षा नवा इतिहास घडवला पाहिजे. राहुल गांधींनी याकडे लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. याची आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. भाजपमध्ये जन्मलेले नवे सावरकर भक्त सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का करत नाहीत, हेच मला कळत नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. यापुढेही आम्ही तो देत राहू. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणे हे ना महाराष्ट्राला मान्य आहे ना शिवसेनेला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. यापुढेही आम्ही करत राहू, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now