सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटला आहे. (sanjay raut criticize on bjp leader)
अशातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला. संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतंय की आता कुणाची बारी आहे, असा सूतोवाच सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ यादीमध्ये महाविकास आघाडी सरकरमधील बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल, असे देखील राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत’, असा इशारा राऊत यांनी सामना अग्रलेखातून किरीट सोमय्या यांना दिला आहे. त्यामुळे आता राऊत विरुद्ध सोमय्या यांच्या वादात आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे.
तर दुसरीकडे दरम्यान, सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ यादीमध्ये महाविकास आघाडी सरकरमधील अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची नाव आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पैसा वसूल ऑफर! Flipkart वर फक्त ८०० रुपयांत मिळवा ३२ इंचाचा स्मार्ट टिव्ही, उरले फक्त काही दिवस
कुत्र्याला घरात काय गादीवर घेऊन झोपा, आमचं काही म्हणणं नाही, पण..; अजितदादा पुणेकरांवर भडकले
जीवघेणी मिठी! छातीला स्फोटकं बांधून बायकोला मारली मिठी; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल
असे शूट झाले ‘गेहराईंया’ चित्रपटातील इंटिमेट सीन्स, पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ प्रयोग