राज्याच्या राजकारणात अजूनही अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र नवीन सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाहीये. यावरून विरोधक देखील आक्रमक झाले आहेत.
याचाच धागा पकडत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन मंत्र्यांवरच चालणारे राज्य सरकार असंवैधानिक असल्याची टीका केली आहे. एवढचं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राऊतांनी केली आहे. तर आता आज आणखी एक सूचक ट्विट राऊत यांनी केलं आहे.
राऊत यांच्या ट्विटने पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. राऊत यांनी राजभवनातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो शेअर करत खळबळजनक टि्वट केलं आहे. राऊत यांच्या ट्विटने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
वाचा काय म्हंटलं आहे राऊत यांनी ट्विटमध्ये…?
सत्तास्थापनेचं पत्र राज्यपालांना देतानाचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला आहे.’या फोटोतील त्यांच्या हास्य मुद्रेवर जाऊ नका दिवा तर कबरीवर देखील तेवत असतो’ असं त्याच्या कॅप्शन मध्ये राऊतांनी म्हटलं आहे. याचबरोबर ‘वेट अॅन्ड वॉच’ असं लिहलं आहे.
उनकी मुस्कुराहट पर न जाना,
दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022
सध्या राऊत यांच हे ट्विट तूफान व्हायरल होतं आहे. ‘उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.’ असं सूचक टि्वट राऊतांनी केले आहे. राऊत यांनी केलेलं हे सूचक व्यक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्याच्या राजकारणात पुढील काळात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, काल राऊत यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. ‘महाराष्ट्राची लोकसंख्या तर १२ कोटी आहे. मात्र, केवळ २ सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ मनमानी निर्णय घेत असून संविधानाचा आदर कुठे आहे?’ असा सवालही राऊतांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांनी काय म्हंटलंय?
…तर आम्ही पुन्हा शिवसेनेत यायला तयार; शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्र्यांचा दावा