राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटनं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं सूचक ट्विट राऊत यांनी केलं आहे.
आपल्या ट्विटमधून संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत दिलेत. राऊत यांनी ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे की, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..”
https://twitter.com/rautsanjay61/status/1539490296412643328?s=20&t=toBM0ThtbTGtGpDD-MLSAg
तर दुसरीकडे राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिंदेंनी आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहचल्यानंतर आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं जाहीर केलं होतं.
तेव्हापासून राज्यामधील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता राऊत यांनी विदानसभा बरखास्तीसंदर्भात ट्विट केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उचवल्या आहेत. राऊत यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (आज) मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचे काही संकेत मिळत आहेत. भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौऱ्यावर जाऊ नये, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागेल, असे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आमची नाराजी उद्धव ठाकरेंवर नव्हे तर…; बंडखोर शिवसेना आमदाराने स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला खिंडार! माझ्यासोबत ४० आमदार, आणखी १० सामील होणार; वाचा शिंदे काय काय म्हणाले
आदित्य ठाकरे मंत्रीपदाचा राजीनामा देणार; ‘त्या’ कृतीतून दिले स्पष्ट संकेत
‘गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा, पण महाराष्ट्रात तलवारीला तलवार भिडेल’ शिवसेनेचा एकनाथ शिंदें गटाला इशारा