Share

..तेव्हा भाजपमुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, राऊतांनी सांगितला २०१९ सालचा किस्सा

राज्यभरात एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ५० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. आता या सगळ्यावर अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांनीही यावर प्रतिक्रिया देत एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हिंदुत्व या गोष्टी फक्त तोंडी लावायला आहेत. २४ तासात त्यांची मंत्रीपदं जातील असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, मनाप्रमाणे गोष्टी फक्त तोंडी लावायला आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडाव्या म्हणून हे बंड करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. २०१९ साली भजापला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदेंना माहिती आहे.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबत संजय राऊत म्हणाले की, २०१९ साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री केले असते. ज्या आमदारांविरोधात किरीट सोमय्या रोज पत्रकार परिषद घ्यायचे, ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या, तेच शिवसेना सोडून गेले. कारण २४ तासात फडणवीसांनी त्यांच्यावरील कारवाया क्लिअर केल्या आहेत.

पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आनंद दिघेंचा हवाला देतात. आनंद दिघेंचे नाव घेऊन राजकारण करू नये. आनंद दिघे हे बाळासाहेबांचे हनुमान होते. कुत्रा सोडला तर बेईमानी कोणीही करू शकतो, हे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मी बाळासाहेबांसोबत जवळून काम केलं आहे. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील गेल्याचे दुख झाले आहे, ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले. त्यांचा जन्म शिवसेनेतच झाला आहे. एकत्र काम केलेले आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवारांबाबत संजय राऊत म्हणाले की, पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत. राजकारण ही शरद पवारांची ऊर्जा आहे. ते थकलेले नाहीत. पवार हे अनुभवी आहेत म्हणून त्यांनी सुत्रे हातात घेतली. महाविकास आघाडीतील प्रत्येक व्यक्ती हे सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
२४ तासात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची मंत्रीपदे जाणार; शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
कोरोनाकाळात एकनाथ शिंदे घरी बसून राहिले नाहीत, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
बंडखोर आमदारांच्या मुलांची युवासेनेच्या पदांवरून होणार हकलपट्टी; सेना पदाधिकाऱ्यांचे आदित्य ठाकरेंना निवेदन
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी आता राज्यपाल मैदानात उतरणार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now