सध्या देशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. हाती आलेल्या निकालांनुसार बऱ्याच ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत बहुमत मिळवले आहे. याठिकाणी पुन्हा योगी आदित्यनाथ यांची सत्ता येण्याची चिन्ह दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर योगींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी आहे. अजूनही उत्तर प्रदेशात मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हातात येतील. त्यानंतर काहीही बोलणे योग्य ठरेल.
अखिलेश यादव भाजपला टक्कर देतील एवढं नक्की आहे असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशातही उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण त्यापैकी एकाही उमेदवाराला खास काही करता आलं नाही. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या लोकांनी खुप मेहनत केली. ही शिवसेनेची सुरूवात होती.
कोणताही पक्ष राज्याबाहेर जात असताना संघर्ष हा करावाच लागतो, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, विरोधकांनी याच मुद्द्याला धरून शिवसेनेवर टोलेबाजी करण्यास सुरूवात केली आहे. पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.
गोवा राज्यात भाजप आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही.
यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊतजी गोव्यात शिवसेना कुठं आहे!!??” असा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! स्मशान भूमीत दोन मित्र भुतासारखे पिसाटले, एकमेकांसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य
आधी माझा हात दाबला अन् नंतर…; मिस बमबमने सांगितला पुतीन यांच्यासोबतचा ‘तो’ भयानक किस्सा
ईडीची नोटीस आल्यावर आम्ही तुमच्यासारखं गप्प बसलो नाही; राऊतांनी राज ठाकरेंना जागा दाखवली
उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; सपा आणि काँग्रेसची दशा दाखविणारे मीम्स व्हायरल