Share

संजय राऊतांनी केलं चक्क नारायण राणेंचं कौतुक, म्हणाले, ‘त्या गोष्टीत मी राणेंना मानतो’

एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते आणि आमदार तसेच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याचे राजकारण सध्या तापलेले आहे. शिंदे गटासोबत शिवसेनेचे ५४ पैकी ३८ आमदार असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालेली आहे. लवकरच शिंदे गट महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेऊ शकतो.

असं जर झालं तर शिंदे गट भाजपसोबत सत्तास्थापन करण्याची तयारी करू शकतो. या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट शक्यता  वर्तवली जात आहे. पण दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिलं आहे की, राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचंही कौतुक केले ज्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ते म्हणाले की, बंडखोर आमदार उगाच खरी शिवसेना, खोटी शिवसेना बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. जे शिवसेनेतून फुटले आणि बाहेर पडले त्यांची  शिवसेना असूच शकत नाही.

जनता दाखवेल कोणाची काय भूमिका आहे. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही सगळे राजीनामा द्या आणि आपआपल्या मतदार संघातून निवडून येऊन दाखवा. त्यातून स्वता जिंकून दाखवा. या एका गोष्टीसाठी मी नारायण राणे यांना मानतो. त्यांचा गट लहान होता पण तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला.

पुढे संजय राऊत म्हणाले की, त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली, अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांचा समाचार घेत नारायण राणेंबद्दल वक्तव्य केलं. यासोबत त्यांनी ज्योतीरादित्य शिंदे यांचंही कौतुक केलं. ते म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदेंच्या सोबत ज्या आमदारांचा गट बाहेर पडला, त्यांनी निवडणूक लढवून जिंकून सत्तास्थापन केली. तशी धमक तुमच्यात दिसली पाहिजे.

हिंमत असेल तर ५४ च्या ५४ आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी आपआपल्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे हे माझं बंडखोर आमदारांना खुल्ल चॅलेंज आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, संजय राऊत असंही म्हणाले होते की, २४ तासांत आमदारांची मंत्रीपद जातील. जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले २० ते २५ आमदार शिंदेंवर नाराज, धक्कादायक कारण आले समोर
महाराष्ट्र्राच्या राजकीय नाट्यात केंद्राची एंट्री, बंडखोर आमदारांना पुरविणार ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा
शिंदे गटातच सुरू झालाय अंतर्गत वाद, लवकरच परतीच्या वाटेवर निघणार सगळे बंडखोर
शिंदे गटातच सुरू झालाय अंतर्गत वाद, लवकरच परतीच्या वाटेवर निघणार सगळे बंडखोर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now