शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. यामुळे राज्यात भूकंप झाला. मात्र असं असलं तरी देखील आता शिवसेनेत मोठी फुट पडल्याच पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘भाजपासोबत शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलं आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वत:ला शिवसेनेचे म्हणत राहतील, तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल,’ असं भाकीत राऊत यांनी केलं आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी म्हंटलं आहे की, “शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायंच होतं, तर नारायण राणेंना का मुख्यमंत्री केलं नाही? असा सवाल उपस्थित करत तेही शिवसैनिकच होते. त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं, तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, असं राऊत यांनी म्हंटलं आहे.
‘देवेंद्र फडणवीसांना राज्य चालवण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यांनी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचा आदेश पाळून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे दोघेही एकमेकांचे राईट हँड असल्याच संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने टीकेची झोड उठवली होती. त्याचाच आधार घेत राऊत यांनी म्हंटलं आहे की, भाजपकडून उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यापासून अडचणी निर्माण करण्यात आल्या. पण अशी कोणतीही अडचण आम्ही निर्माण करणार नाही.’
‘अडीच वर्षाचा करार होता, त्याचं पालन आत्ता भाजपानं केलं आहे. तेव्हा शब्द पाळला असता, तर अडीच वर्षांचा काळ आत्ता कुणाचातरी एकाचा संपला असता. शिवसेना भाजपा युती कायम राहिली असती,’ असं देखील संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आता राऊत ही काहीसे आक्रमक झालेले देखील पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात