Share

आमच्यापेक्षाही वाईट हाल तुमचे पंजाबात झालेत, तिथं विजय मिळवून दाखवा; शिवसेनेचे भाजपला आव्हान

Sanjay-Raut-PM-Modi.

गुरुवारी देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती आले. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता चार राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले. विशेषत: उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मिळालेले यश अभूतपूर्व असे आहे.

मात्र पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आपने बाजी मारली आहे. तसेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे. या निवडणुकीत संपूर्ण देशाच लक्ष पंजाबकडे लागले होते. या निकालावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

‘आधीपासूनच उत्तर प्रदेश भाजपचा होता. तसेच उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची मोठी ताकद होती, म्हणूनच तिथे त्यांना विजय मिळवता आला. मात्र, पंजाबसारख्या सेंसेटीव्ह राज्यात भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला विजय मिळवता आला नाही. पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा,’ असे खुलं आव्हान राऊत यांनी भाजपला दिले.

या निवडणुकीत शिवसेनेलाही धक्का बसला. यावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, आमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत. पंजाबमधील नागरिकांनी तुम्हाला नाकारले, तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही.’

भाजपच्या घवघवीत यशाबद्दल बोलताना पुढे संजय राऊत म्हणाले, “लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचं आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत.”

तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ
PHOTO : राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीसमोर गुरूनाथही पडेल फिका, वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी
‘खलिस्तानी समर्थकांच्या मदतीने ‘आप’ने पंजाब निवडणुकीत विजय मिळवला’, शीख ऑफ जस्टीसच्या आरोपाने खळबळ
‘ना लग्न, ना मुले, ना सत्तेचे भोगी, ज्यांना पाहून घाबरतात गुंड, तेच आहेत युपीचे योगी’; कंगनाच्या हटके शुभेच्छा

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now