sanjay raut shocking statement on udayanraje | भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. यावर भाजप खासदार उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंनी भाजपमध्ये राहता कामा नये, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
मुंडकं छाटण्याची भाषा करण्याऐवजी उदयनराजेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा. ज्या पक्षानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यांच्या पक्षात राहणं योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी म्हटले आहे.
उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. भाजपच्या अनेक लोकांनी मुंडकं छाटण्याची भाषा केली आहे. हा संताप असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहे. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे भोसले यांच्या वाणीतून होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे संजय राऊतेंनी म्हटले आहे.
तसेच उदयनराजे साताऱ्याच्या गादीचे छत्रपती आहे. संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील चीड बाहेर येणे स्वाभाविक आहे. सामान्य माणसांनाही तेवढीच चीड आहे, असेही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
उदयनराजे यांनी सगळ्यात आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. ज्या पक्षाने आमच्या दैवताचा अपमान केला आहे, त्या पक्षाचं समर्थन केलं जात आहे. यावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही. आम्ही उदनयराजे यांच्यासोबत आहोत. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर भाजपने ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. आमच्या तीव्र भावना आहे. शिवसेनेचा उदयनराजेंशी संवाद सुरु आहे. लवकरच त्याबद्दल कृतीशीलता दिसेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत उदयनराजेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देत असल्याचीही चर्चा राजकारणात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Uttar Pradesh : नवरदेवाने स्टेजवरच घेतले नवरीचे चुंबन; नवरी मुलीने भर मंडपातून नवरदेवासकट वऱ्हाडींनाही हाकलले
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर जन्मापासूनच आहे बहिरा, ‘या’ कारणामुळे पडले वॉशिंग्टन नाव; आता मोडला कपिल देवचा रेकॉर्ड
ruturaj gaikwad : एका षटकात ७ षटकार ठोकण्यामागचं गुपित अखेर ऋतुराजने उलगडलं; म्हणाला, त्या व्यक्तीमुळे…