Share

‘राष्ट्रपतीच हवा असेल तर शरद पवार, आणि फक्त रबर स्टॅंप हवा असेल तर मग दिल्लीत रांग लागलीय’

sharad pawar
सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. तर आता विधान परिषदेसाठी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तर अशातच नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै मतदान पार पडणार आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांना एकजूट करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीसाठी ममता यांनी २२ प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून निमंत्रण दिले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीवर होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. या देशाला राष्ट्रपती हवाय की रबर स्टॅम्प हे ठरवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा विचार करायला हवा,’ असं संजय राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘जर तुम्हाला रबर स्टॅम्प हवा असेल तर मग फार नेत्यांची रांग दिल्लीत लागली आहे.’ दरम्यान, नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

दरम्यान, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेचे अनेक नेते अयोध्येत पोहोचले आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आधीच अयोध्येत हजर आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्याच्या ऋतुराजची ‘तुफान’ फटकेबाजी, मारले पाच चेंडूत पाच चौकार; पाहा व्हिडिओ
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now