Share

भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली; संजय राऊत स्पष्टच बोलले

sanjay raut

पुण्यात जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस नेते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी विविध मुद्य्यावरून या नेत्यांना अनेक प्रश्न विचारले गेले, ज्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

यावेळी ‘राज्यात शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप मोठा झाला का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत म्हणाले, ‘राज्यात शिवसेनेच्या मदतीने भाजप पक्ष वाढला हे खरं आहे,’ असं संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी भाजपला लक्ष केलं आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आज विधानसभा किंवा लोकसभेत भाजपची जी ताकद दिसतेय, त्यातील 75 टक्के लोकं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले आहेत. त्यांनी काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हंटले आहे. भाजपने काही लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामील करुन घेतलं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

मात्र असे असले तरी देखील 2024 च्या आधी त्यांचं अर्ध दुकान खाली होणार असून हाफ चड्डी घालणारे फुल पँट शिवायला टाकणार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच अलीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाया होत आहेत. या कारवाईबद्दल राऊत यांना पत्रकारांनी विचारले.

राऊत ईडी कारवाईबद्दल बोलताना म्हणाले, धाडींना आपण खाबरत नाही. माझ्या नातेवाईकांच्या घरी जेव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री मी दिल्लीत होतो. धाडीच्या दुसऱ्या दिवशी मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला त्यांना सांगितलं मी दिल्लीत आहे. मला अटक करा, माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका. मी घाबरत नाही.’

नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला तर राऊत म्हणाले, त्रास म्हटलं तर होतो. परंतु, करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येतील.’

महत्त्वाच्या बातम्या
आव्हाड संतापले! म्हणाले, अक्षय कुमार हा मूर्ख माणूस, पुरंदरेंवरही केले ‘हे’ गंभीर आरोप
बृजभूषण यांना कोणी मॅनेज करु शकतं हे डोक्यातून काढून टाका; शरद पवारांचा मनसेला टोला
‘पिंपरी-चिंचवडच्या सर्व अडचणी सोडवतो, जनतेनं १०० नगरसेवक निवडून द्यावे’ – अजित पवार
‘मेजर’ पाहून शहीद संदीप उन्नीकृष्णनचे आई-वडील भावुक, अभिनेत्याला मिठी मारत सांगितली आठवण

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now