आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेची सुरुवात करताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.”
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता असं खासदार संजय राऊत म्हणाले.
राऊत यांनी अत्यंत जहरी भाषेत सोमय्यांवर टीका करताना त्यांनी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप केला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज (mohit kambhoj) यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच मोहीत कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन डुबणार असल्याचा दावाही केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे, असे राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली, अशी माहिती देखील राऊत यांनी दिली.
पुढे बोलताना राऊत यांनी सोमय्या यांचा उल्लेख दलाल असा केला आहे. ‘ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आनंद महिंद्रांच्या मोठ्या खेळीने टाटा, मारुती सुझुकी, ह्युंदाईला बसणार झटका; वाचा सविस्तर..
‘माझं खुलं आव्हान आहे ईडीला, मला जेलमध्ये टाकून दाखवा पण माझ्यासोबत…, संजय राऊत संतापले
राऊत विरुद्ध सोमय्या: …तर मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचे किरीट सोमय्या यांना आव्हान
हायकोर्टाच्या आदेशानंतरही शाळेत मुली घालून आल्या हिजाब; वाद वाढण्याची शक्यता