शिवसेना संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देईल अशी चर्चा होती, पण शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात होते. (sanjay raut on shivendraraje)
संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिलेला शब्द मोडला अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली होती. तसेच त्यांनी निवडणूकीत माघारही घेतली.
संभाजीराजेंच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यभरातून शिवसेनेवर टीका केली जात आहे. भाजपही शिवसेनेवर निशाणा साधताना दिसून येत आहे. अशात भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केला अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली होती.
आता शिवेंद्रराजेच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. शिवेंद्रराजे यांनी कितीवेळा पक्ष बदललाय? त्यांच्या घरातील किती लोकांनी कितीवेळा पक्ष बदलले आहेत? ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजेंना राजकीय पक्षाचं वावडं आहे का? तुम्ही कशाला आमचं तोंड उघडायला लावताय, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊतांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना सर्व नेत्यांना सुनावले आहे. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासून आदर होता आणि आजही आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी भाजपमधील शिवेंद्रराजे यांच्यावरही टीका केली आहे. हा विषय संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकेच वाटत होते, तर त्यांनी ४२ मतं संभाजीराजेंना द्यायला पाहिजे होती, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच राज्यसभेचा उमेदवार म्हणून शिवसैनिक जाणार हे आमचं सुरुवातीपासूनच ठरलं होतं. आधीपासूनच शिवसेना सामान्य शिवसैनिकाचा विचार करत होती. त्यामध्ये कोल्हापूरचे संजय पवार आणि नंदूरबारचे पारवे यांच्या नावाचा विचार सुरु होता. अशा शिवसैनिकांना विधीमंडळात किंवा संसदेत प्रतिनिधित्व करायला द्यायला हवे, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. याच भूमिकेतून आम्ही संजय पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
यंदाच्या महापालिका निवडणूकीत भाजपलाच अच्छे दिन, शिवसेनेला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा
जीवनावश्यक वस्तू फक्त त्याच व्यवसायिकाकडूुन खरेदी करेल, जो हिंदू धर्माचा…; हिंदू महासंघाने घेतली शपथ
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका