Share

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कनेक्शन आलं समोर, संजय राऊतांनी विचारला बोचरा सवाल

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कार्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात अडकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तपासात अनेक धागेदोरे सापडत असल्याने हे प्रकरण अधिक गाजले. अशातच एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यु झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. (sanjay raut on prabhakar sail death)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याचे निधन झाले. पण त्याचा मृत्यु संशयास्पद असल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर त्याच्या पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आला असून त्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.

अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात ट्विस्ट आणला आहे. त्यांनी याप्रकरणी थेट भाजपच्या एका तरुण नेत्यावर बोट दाखवले आहे. संजय राऊत यांनी सामनामधील रोकठोकच्या सदरात साईलच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केला आहे.

कार्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात जे झाले त्यात शाहरुख खानच्या मुलाला अडकवण्यात आले आहे. ज्या प्रभाकर साईलमुळे एनसीबी अधिकाऱ्याचा खोटेपणा समोर आला, तोच प्रभाकर साईल आता संशयास्पदरित्या मरण पावला. या प्रकरणातील संबंधित अधिकारी भाजपच्या एका तरुण पुढाऱ्याचा अनैतिक पाहुणचार घेतात, त्यातूनच साईलचे बरे वाईट झाले की काय हा तपासाचा विषय आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच प्रभाकर साईलच्या मृत्युचा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये. ते रहस्यमय तितकेच धक्कादायक असू शकते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमागे भाजपचा एक प्रमुख नेता आणि एक-दोन बड्या अधिकाऱ्यांचा खेळ असू शकतो, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

माझ्यावर व्यक्तिश: ईडीने कारवाई केली, त्यास कोणता आधार नाही. पण सिलेक्टेड टार्गेट्स या पद्धतीने महाराष्ट्रात, बंगालात कारवाया सुरु आहे. अशा कारवायांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा थेट हस्तक्षेप असेल असे दिसत नाही. पण महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते आणि एक-दोन बडे अधिकारी मिळून हा गेम खेळत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
चक्क ब्राम्हण मुलीने ओळखपत्रातून आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची केली मागणी; काय आहे नेमकं कारण वाचा
“त्यांचा हेतू स्वच्छ नव्हता, त्यांना शरद पवारांना…”, आव्हाडांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांची संपत्ती परत करा; रुपाली पाटील यांची पोस्ट तुफान व्हायरल, वाचा पोस्ट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now