शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लूमध्ये थांबले आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आले आहे. (sanjay raut on mla)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण शिवसेनेचे नेते हे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंडखोर आमदारांशी बोलणं होत असल्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारले आहे. तर आजचा हा सहावा दिवस आहे. एकनाथ शिंदेंसोबत जाणारे काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे खुद्द संजय राऊत यांनीच सांगितले आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असू शकतो, असेही म्हटले जात आहे.
सध्या शिंदे गटातील सर्व आमदार गुवाहटीमध्ये तळ ठोकून आहेत. ते पुन्हा मुंबईत येण्यासाठी तयार नसल्यामुळे शिवसेनेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये बंड होण्याची शक्यता आहे. तसेच आमदारांशी आपलं बोलणं सुरु आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊतांसोबत नक्की कोणते आमदार बोलताय अशीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ते आता पुन्हा राजभवनात दाखल झाले आहे. त्यामुळे कायदेशीरबाबींना वेग आला आहे. अशात बंडखोरी करणारे आमदार पुन्हा मुंबईत येण्याची शक्यता आहे. सोमवारी ते मुंबईत दाखल होतील, असे म्हटले जात आहे.
सध्या शिंदे समर्थकांना मुंबईच्या विमानतळावर उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. याबाबत मुंबई विमानतळाला देखील अलर्ट केले गेले आहे. तसेच शिंदे गटाची एक टीम सुप्रिम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंनी बाजी पलटवली! १५ ते १६ बंडखोर आमदार संपर्कात
तुम्ही वरळीला फिल्डींग लावा नाहीतर दादरला लावा! बंडखोरांना सभागृहात आणायला भाजपचा भन्नाट प्लॅन
बंडखोरांना राजभवनात आणायला भाजपने आखला ‘हा’ प्लॅन; राज्यातील बड्या नेत्याचा खुलासा