राज्याच्या राजकारणात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. तसेच ते शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही आरोप करत आहे. (sanjay raut on kirit somaiyya)
शिवसेना नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोपप्रत्यारोपणाचा खेळ सुरु आहे. अशात संजय राऊत यांनी आता किरीट सोमय्यांवर निशाणा साधताना ईडी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहे. किरीट सोमय्यांनी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हान संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिले आहे.
संजय राऊतांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाबाबतही ट्विट केले आहे. तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहे, त्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना म्हटले आहे. संजय राऊतांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
किरीट , आपण हे सांगू शकाल का? वेवूर ( पालघर ) येथील निरव डेव्हलपर मध्ये २६० कोटीची गुंतवणूक कोणाची आहे? येथे nikon green ville या प्रोजेक्टमध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का? यात कोणत्या ED joint director ची बेनामी गुंतवणूक आहे? महाराष्ट्राला कळू द्या जय महाराष्ट्र!, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1494935141952622592?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1494935141952622592%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Fshivsena-leader-sanjay-raut-asking-questions-to-bjp-former-mp-kirit-somaiya-1034528
दरम्यान, शुक्रवारी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लई प्रकरणावरुन टीका केली होती. भाजपचे लोक मराठी माणसांना संपवू पाहत आहे. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले होते.
तसेच त्यांना कुठे जायचंय तिथे जाऊ द्या. ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आहेत, लफंगा आहेत. सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी किरीट सोमय्यांवर टीका करतान म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून सुनेला सासरच्यांनी जिवंत जाळलं, कारण वाचून हादरा बसेल
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यामुळे आईने मुलालाच संपवले; औरंगाबादची भयानक घटना
‘जय भवानी’ घोषणा बाबासाहेबांचीच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा