Share

..तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील; शिवसेनेचा खळबळजनक दावा

अखेर राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, ज्यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली, पण यात महाडिकच जिंकले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी ठरल्याचे म्हटले जात आहे. (sanjay raut on devendra fadanvis)

शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते भाजपवर आणि अपक्ष आमदारांवर वेगवेगळे आरोप करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनाला मतदान करतील, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.

महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकीचं जे चित्र स्पष्ट झालं. त्यात काही नवे नाही. केंद्र सरकारकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्याकडेही यंत्रणा आहे. मात्र ईडी नाही, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप निवडणुका जिंकण्याचा डाव टाकत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवरही भाष्य केले आहे. कोणत्याही अपक्षांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आता निवडणुक झाली आहे. त्यामुळे तो विषय आता संपला आहे. असे म्हणत संजय राऊतांनी आणखी बोलणे टाळले आहे.

तसेच महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात निवडणूक आयोगाला हाताशी धरुन राज्यातले नेते काय करत होते? गृहखात्याचे कसे फोन येत जात होते. हे आम्हाला माहिती आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच आमच्याकडे दोन दिवसांसाठी ईडी दिली तर आम्ही फडणवीसांनाही आम्हाला मत द्यायला लावू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेची निवडणूकीची चर्चा होत होती. या निवडणूकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपला उमेदवार जिंकेन असे सांगत होते. पण अखेर धनंजय महाडिकांचा विजय झाला. तसेच शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड हेही विजयी झाले.

महत्वाच्या बातम्या-
‘भाऊ तुमच्यामुळेच मी खासदार झालो’; विजयाचा जल्लोष सोडून महाडिक गेले जगतापांच्या भेटीला
राज्यसभा निवडणुकीनंतर आघाडीत बिघाडी, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; राजकीय वर्तुळात खळबळ
‘ते’ वादग्रस्त व्यक्तव्य भोवलं! नुपूर शर्माचा पाय खोलात; पोलिसांनी घेतली मोठी अॅक्शन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now