शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. सध्या त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. (sanjay raut on amit shaha)
राजकीय घडामोडींना वेळोवेळी वेगळं वळण लागताना दिसून येत आहे. बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह केले होते. त्यामध्ये त्यांनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. पण आमदारांची मनं वळवण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर शिवसेना नेता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे, हे स्वत: आता सक्रीय झाले आहे. संजय राऊत बंडखोर आमदारांना सुनावताना दिसून येत आहे. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीतून कसे वाचले हेही सांगितले आहे.
प्रताप सरनाईक मला भेटले होते. त्यांनी दिल्लीत फडणवीसांसोबत भेट झाल्याचं मला सांगितलं. फडणवीसांनी सरनाईकांना अमित शहांना भेटवलं आणि सगळं मॅटर साफ केलं, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यशवंत जाधव आणि त्यांची बायको यांचंही मॅटर सुद्धा अमित शहांनी साफ केलं, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली. माझ्या राहत्या घरावर छापा पडला. माझ्या लहान मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागला. यानंतर रात्री १२ वाजता मी अमित शहांना फोन केला होता. अमित शहांना सांगितलं मला अटक करा. माझ्या जवळच्या व्यक्तींना त्रास देऊ नका, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महापालिका आपण प्रचंड बहुमताने जिंकलो तर हे चाळीस चोर कायमचे मातीत गाडले जातील. सेनेतील ही कीड कायमची संपेल. आम्ही स्वत: उभे राहू आणि यांचा बंदोबस्त करु. बाळासाहेबांशी गद्दारी केली तो संपला. हिंमत असेल, तर राजीनामे द्या. एका बापाचे असाल तर राजीनामे देऊन दाखवा, हे मी चॅलेंज करतो, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील काय भाषण करतो. ढुंगणाला पाय लावून तो पळून गेला. तो आधी पान टपरी चालवायचा. आता त्याला परत पान टपरीवर बसवणार. हे महाभारतातल्या संजयाचे शब्द आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिंदेंच्या बंडात फडणवीसांची एंट्री; भाजपच्या नव्या खेळीमुळे महाविकास आघाडीचा दि एन्ड
गद्दारांना माफी नाही! बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ दोन पर्याय
अखेर बंडखोरांसोबत बैठक घेत फडणवीसांनी टाकला ‘हा’ डाव; मविआचा खेळ खल्लास