भाजपच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे. ज्यादिवशी ते मुंबईला येतील तेव्हा २१ आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच गेलेल्या सर्व आमदारांनी मुंबईला यावं. त्यांनी चोवीस तासात मुंबईला यावं. ते जर आले तर त्यांची जी भूमिका आहे, ती जाणून घेऊ. त्यांची भूमिका स्वीकारण्याचा विचार करु, पण त्यांनी चोवीस तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी, असा अल्टिमेटम संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
संजय राऊतांच्या या अल्टीमेटमला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, आमच्याकडे ४० आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता गाडी खुप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
त्यानंतर आता पुन्हा संजय राऊतांनी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे हे १८ आमदार नक्की कोण आहेत? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर पर्यावरणमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे आहेत. त्यानंतर अजय चौधरी, रमेश कोरगावकर, उदय सामंत, वैभव नाईक, रवींद्र वायकर, उदयसिंह रजपूत, संतोष बांगर आणि भास्कर जाधव हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
याशिवाय सुनील राऊत, राजन साळवी, दिलीप लांडे, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील, सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर आणि संजय पोतनीस हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आले आहेत.
https://twitter.com/rautsanjay61/status/1539941462498054144?s=20&t=rgCRVLmozYl2tsq7ojZ93w
महत्वाच्या बातम्या
VIDEO: शमा सिकंदरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, स्विमिंग पुलमध्ये दाखवली किलर स्टाईल
‘आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुटेगा’, खरी झाली कंगनाची भविष्यवाणी, व्हिडीओ होतोय व्हायरल
‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना फुटला घाम, श्री राम बनण्यासाठी प्रभासची तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मागणी
पुष्पा 2 मध्ये खरंच श्रीवल्ली मरणार का? स्टोरी लीक झाल्यानंतर दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा, म्हणाला..