सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. एकेकाळी सोबत असलेले आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. याला निमित्त ठरले एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल 40 आमदार गेले आहेत. बंडखोरी केलेले आमदार आता शिवसेनेवर टीका करत आहेत. प्रामुख्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ते लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. याचबरोबर शिवसेनेतल्या बंडाळीला राऊतच जबाबदार असल्याच ते म्हणत आहेत.
अशातच आता बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. शिरसाट यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांवर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे. ‘राऊत हा मूर्ख माणूस आहे, त्यांना अजून राजकारण माहीत नाही, असं शिरसाट यांनी म्हंटलं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी म्हंटलं आहे की, ‘राऊतांनी उद्धवसाहेबांना छोटं केलं आहे. ते आता शिवसेनाप्रमुखांना देखील छोटं करायचं काम करत आहेत. शिवसेनाप्रमुख त्यांचा सन्मान कमी करण्याचं काम राऊत करत असल्याचा घणाघाती आरोप शिरसाट यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी बंडखोर आमदारांना खडसावले होते. ‘स्वाभिमान असेल तर स्वत:चा पक्ष काढा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरू नका,’ असा सल्ला राऊत यांनी दिला होता. राऊत यांच्या याच विधानावर शिरसाट आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
राऊत यांच्या व्यक्तव्यावर बोलताना शिरसाट यांनी म्हंटलं आहे की, “संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे. उद्या जर कुणी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचं नाव वापरू नका, तर कसं चालेल? बाळासाहेब ठाकरेदेखील आता त्याच स्तरावर चालले आहेत. यामुळे अभिमान असला पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या
श्रीलंकेमध्ये एका कुटुंबाकडे सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे परीणाम काय झाले आपण बघतोय, म्हणून..
शिंदे गटात गेल्याने पक्षाकडून विजय शिवतारेंवर मोठी कारवाई; बंडखोरांविरोधात शिवसेना आक्रमक
मुलं ७ ला शाळेत जाऊ शकतात तर न्यायाधीश ९ ला कोर्टात का येऊ शकत नाहीत? न्यायमुर्ती संतापले
..जेव्हा ललित मोदी बनले राजस्थानचे सुपर CM, त्यांच्यामुळे वसुंधरा राजेंची झाली होती बदनामी