शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली.
आता यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून विविधांगी प्रतिक्रिया उमटत आहेत. पवार यांच्या घराबाहेर केलेल्या हिंसक आंदोलनाचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पवारांना टोलाही लगावला.
‘कर्म असतं ना.. कर्म.. जे आपण या जन्मी करतो ना.. प्रत्येक जण.. मला लागू होतं तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. त्यातून सूट कोणाला नाही. जे आपण या जन्मी करतो ते याच जन्मी आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार..’ असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना सुनावलं आहे. ‘ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही उपरे आहात, पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असे संजय राऊत म्हणाले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रतील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे, अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होतेय. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
वाचा काय घडलं काल ‘सिल्व्हर ओक’वर… शनिवारी अचानक दुपारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून दगडफेक, चप्पलफेक केली.
या आंदोलनाची माहिती मिळताच खा. सुप्रिया सुळे यांनी तातडीने सिल्वर ओकवर धाव घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षा राखी जाधव होत्या. संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची खा. सुप्रिया सुळे यांनी थेट भेट घेतली. शांततेच आवाहन केले इतकंच नव्हे तर त्या थेट आंदोलकांशी भिडल्या.
महत्त्वाच्या बातम्या
माझी हत्या होऊ शकते, हे सगळं शरद पवारांचं कारस्थान, ऍड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
“मिडीया व भाजप नेत्यांनी सत्य लपवलय, भारताचीही अवस्था श्रीलंकेसारखीच होणार आहे”
पोलिसांनी समन्स बजावताच किरीट सोमय्या मुलासोबत झाले अंडरग्राऊंड, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुस्लिम नेताही म्हणाला, नवरात्रीत मांसबंदी पाहीजेच; लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केलं स्वागत