Share

“द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या अनेक घटना खोट्या, काश्मिरी पंडितांना वाचवायला मुस्लिम अधिकारी आले होते”

सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने, त्याचे प्रमोशन कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झाले नव्हते, तरीही तो खूप चर्चेत असून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. (sanjay raut criticize the kashmir files)

या चित्रपटावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप भावूक झाले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात या चित्रपटाला राजकीय वळण आलेले असून राजकीय नेतेही या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

आता या चित्रपटावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरु आहे. नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

द काश्मीर फाइल्समध्ये अशा अनेक गोष्टी आहे, ज्या असत्य आहे. ज्या घडलेल्या नाही. पण तो चित्रपट आहे. ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील ज्यांना ते खटकलं आहे, ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले आहे. सुरक्षा दलातील मुस्लिम पोलिसांना देखील दहशतवाद्यांनी मारले आहे. काश्मिरी पंडीत सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? काश्मीरमधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार? काश्मीरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक कधी करणार आहात? सर्वात महत्वाचे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडणार आहात? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहे.

जर कोणी काश्मीरचा विषय काढत असेल, तर ते काश्मीर या विषयाला पुन्हा एकदा विषाची उकळी देत आहेत. शिवसेना कधीही हिंदूत्व विसणार नाही आणि विसरलेली नाही. हिंदूत्व कोणी विसरले याचे आत्मचिंतन भाजपने करावे. हिंदूत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन करावे, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
कॅटरीना आणि विक्कीने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात रोमँटीक फोटो, चाहतेही झाले फोटोवर फिदा
‘या’ आजारामुळे तरुणीने स्वतःच्या शरीराची केली भयंकर अवस्था; चावून, ओरखडून केल्या असंख्य जखमा
“जनाब फडणवीसजी..! चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now