काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. ‘पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं यांनी म्हंटले आहे. राऊतांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. राज्यातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,” अशी आठवण राऊत यांनी पंतप्रधान मोदींना करुन दिली आहे.
दरम्यान, देशाच्या अधोगतीपासून, महागाई आणि कोरोना या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका मोदी यांनी केली होती. मोदी म्हणाले, ‘पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता.’
मात्र काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र कॉंग्रेस जबाबदार असल्याचे मोदी म्हणाले होते.
तसेच काँग्रेस सरकारच्या काळात महागाई दर दुहेरी अंकांमध्ये पोहोचला होता. तेव्हा महागाई आवाक्याबाहेर आहे, असं काँग्रेस सरकार म्हणत होतं. पण आता भाजप सरकारमध्ये कोरोनाचं संकट असतानाही महागाई 5.3 टक्के राहिली आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
मॅन विथ गोल्डन हार्ट: सुनील ग्रोवरच्या तब्येतीची सलमान घेतोय काळजी, डॉक्टरांना दिला हा सल्ला
मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने साजरी केली पहिली संक्रात, मराठमोळ्या अवतारातील फोटो व्हायरल
…अन् अकरा वर्षीय मुलाच्या जीवनाची दोरच तुटली; वाचा पतंग उडविताना नेमकं असं घडलं तरी काय?
पुण्यातील सारसबागेसमोर एक आजीबाई मागत होत्या भीक, चौकशीदरम्यान समोर आले वेगळेच सत्य