सध्या राज्याच्या राजकारण भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. (sanjay raut criticize bjp former mp kirit somaiya)
या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का, अशी टीका सोमय्या यांनी केली होती. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी अपशब्दाचा वापर केला.
ते म्हणाले की, “कोण आहेत किरीट सोमय्या? देशात असे चु** फार आहेत. देशातील अशा प्रत्येक चु** वर, शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणं मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु** लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशात राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असेल. १० मार्चनंतर तुम्हाला कळेल”.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पुढे राऊत म्हणाले, देशाच्या राजकारणात बदल घडत आहेत. वर्ष 2024 नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी xxxलोक राजकारणातून संपतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत असे वक्तव्य करणे हा राज्याचा अपान आहे.’
दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी मराठी जनतेचा अपमान असल्याचं म्हटलं. मराठीचा अपमान करणाऱ्या लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देतं, असं संजय राऊत म्हणाले.
तर दुसरीकडे भाजपची कोंडी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे. घटनेने दिलेले राज्यांचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ठाकरे यांनी राव यांचे अभिनंदन करीत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई भेटीत पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘रावसाहेब दानवेंना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय’, फुकट वडापाव प्रकरणात नवा खुलासा
उद्धव ठाकरेंनी पत्नीवर अन्याय केला, मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी.., सोमय्यांचा खळबळजनक आरोप
दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, तिन्ही अपघात सारखेच, घातपाताचा संशय आल्याने उचलणार ‘हे’ पाऊल
आघाडीतच बिघाडी! काँग्रेसने शिवसेनेवर लावला तब्बल ५०० कोटींच्या घोटाळ्याचा खळबळजनक आरोप





