Share

शिंदेंनी राऊतांचं घरच फोडलं? संजय राऊतांचा सख्खा भाऊ गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. सध्या त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे.

राजकीय घडामोडींना वेळोवेळी वेगळं वळण लागताना दिसून येत आहे. बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह केले होते. त्यामध्ये त्यांनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. पण आमदारांची मनं वळवण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे.

तेव्हापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. अनेक विश्वासू नेत्यांनी पक्षाला धोका दिल्याने संजय राऊतही संतापले आहेत. आमदारांनी बंड केल्यापासून संजय राऊतांनी त्यांच्यावर ताशेरे ओढण्यास सुरूवात केली आहे.

आता संजय राऊतांनाच धक्का बसण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचे सख्खे भाऊ सुनील राऊत यांनीही शिंदे गटात जाण्याचं ठरवलं आहे. ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर आली आहे. जर असं झालं तर शिवसेनेला आणि मुख्यत: संजय राऊतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे आधीपासूनच नाराज होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाल्याची बातमी समोर आली होती.  त्यानंतर आज ते शिंदे गटात सहाभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

नाराज असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे  का? आणि संजय राऊतांची  यावर काय प्रतिक्रिया असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर शिवसेना घरातूनच फुटतीये का काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर असं झालं तर शिवसेनेत खळबळ माजेल.

महत्वाच्या बातम्या
तो आधी पान टपरी चालवायचा त्याला पुन्हा पान टपरीवरच बसवणार; बंडखोर मंत्र्याला संजय राऊतांचा इशारा
अब्दुल सत्तारांना हिंदुत्व कळते का? म्हणणाऱ्या राऊतांना सत्तारांनी सुनावलं; म्हणाले, मी हिंदुत्ववादी…
मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करू नका अन्यथा.., क्रांती मोर्चाची शिवसैनिकांना वॉर्निंग
भावी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंच्या गावात अजूनही वीज नाही, फोन चार्जिंगसाठी जावं लागतं एक किमी दूर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now