Share

मुंबईत फिरतो, तेव्हा अर्धी मुंबई हिंदीत बोलते; संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं वेगळं नातं

sanjay raut

शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तसेच प्रचारसभाही घेत आहे. आता उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली आहे. (sanjay raut at uttar pradesh rally)

यावेळी संजय राऊतांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात हुंकार भरली. यावेळी संजय राऊतांनी मुंबईबाबतही भाष्य केले आहे. मुंबईत लाखो लोक हिंदी भाषिक आहे. इतकंच नाही, तर मुंबईत अर्धी लोक हिंदी भाषेत बोलतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आम्ही जेव्हा मुंबई फिरतो तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक आम्हाला दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. जिथे आम्ही जातो तिथे १० लोकांपैकी ४ लोकं सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचं उत्तर प्रदेशची नातं आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

शिवसेनेने कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. आमच्या हातात हिंदूत्वाचा भगवा आहे. पण त्याचबरोबर आमच्यासोबत मुसलमान, शिख, ख्रिश्चनही आहेत. आम्ही देशभक्त आहोत आणि देशभक्तीचं राजकारण आम्ही करतो. कोणाच्या शरीरात कोणाचं रक्त आहे, हे १० मार्चला स्पष्ट होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा मला मुंबईतच सभा घेतोय असं वाटलं. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

या प्रचारसभेत बोलताना संजय राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला. शिवसेनेचं उत्तर प्रदेशात काय काम आहे? असं अनेकजण विचारतात. पण, २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल, तेव्हा त्यांना समजेल शिवसेनेचं काय काम होतं, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मापेक्षा घातक असलेल्या युवा फलंदाजाला BCCI ने डावलले; कारकीर्द संपण्याच्या मार्गावर?
ठाकरे सरकारचा जोरदार पलटवार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
तरूण शेतकऱ्याने शेतात मोती पिकवत कमावला तुफान पैसा; पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now