Share

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं, हे बंडखोर नाहीत बदमाश आहेत- संजय राऊत

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी केली आहे. त्यामध्ये जवळपास ४१ आमदारांचा समावेश आहे. त्या आमदारांचा एक व्हिडीओही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

या आमदारांचा आकडा वाढतच चालला आहे. या सर्वावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलावली नाही. या बंडखोर आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं. यांना मी बंडखोर नाही बदमाश म्हणेल, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली.

संजय राऊत पुढं असंही म्हणाले की, जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री जे रस्त्यावर होते  ती खरी शिवसेना आहे. २० लोकं आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला. पुढे बंडखोरांवर टीका करताना ते म्हणाले की, फक्त बाळासाहेबांचे भक्त बोलून चालत नाही, तर बाळासाहेबांचे भक्त कधीही दबावाला बळी पडून बाहेर जात नाहीत.

दरम्यान, नुकतीच पुन्हा संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी स्पष्ट केलं की, जर तुम्हाला वाटत असेल की शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं तर तुम्ही मुंबईत या. यावर आपण चर्चा करू आणि तोडगा काढू. फक्त व्हॉट्स अप, ट्विटरवरून पत्र पाठवून मेसेज करून काही होणार नाही. बंडखोरांनी मुंबईत यावं त्यानंतर या गोष्टीवर विचार केला जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी ८ ते ९ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात. पण पक्षांतरविरोधी कायदा त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची परवानगी देत नाही त्यामुळे त्यांना नाईलाजाने शिवसेनेतच राहावे लागणार आहे.

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. काल रात्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून सगळं सामान गुंडाळून मातोश्रीला पोहोचले आहेत. दरम्यान, जे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात ते आमदार शक्यतो कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे असं बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची स्क्रिप्ट लिहिलीय; ‘या’ गोष्टींवरून तेच सिद्ध होतय
हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग आम्हाला अयोध्येला जाण्यापासून का अडवलं? बंडखोर आमदारांचा ठाकरेंना सवाल
VIDEO: पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी.., सध्याच्या राजकारणावर काय म्हणाली प्राजक्ता माळी?
ज्यांना जायचंय त्यांनी जा…’ मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर ‘हे’ ६ आमदार शिंदे गटात दाखल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now