शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद या त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दीपाली सय्यद यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे चर्चा करायला एकत्र येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. (sanjay raut angry on dipali sayed)
दीपाली सय्यद यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं आहे. त्या पदाधिकारी आहेत, शिवसेनेच्या नेत्या नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच ट्विट करताना विचारपूर्वक ट्विट करावे असा सल्लाही दिला आहे.
दीपाली सय्यद ही एक अभिनेत्री आहे. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. तसंच त्या प्रवक्त्या देखील नाही. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्यं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदे गट हे एकत्र येतील की नाही, हे येणार काळ ठरवेल. एकत्रित यावं असं आम्हाला का वाटणार नाही. कारण ते आमचेच सहकारी आहे. आमचेच मित्र आहे. ते आज माझ्यावर टीका करत असले तरी त्यांची आज मजबूरी आहे. भाजपमुळे त्यांच्यावर अशी वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आमचे सात मंत्री होते, पण इथे तर फक्त दोनच मंत्री काम करताना दिसून येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा होत आहे. सरकार घटनाबाह्य असल्याची भिती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला आहे. त्यांनी घटना तुडवायची ठरवली असेल, तर त्यांची मर्जी, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटूंबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या-
PHOTOS: ‘या’ आहेत जगातील सगळ्यात घातक कुत्र्यांच्या प्रजाती, घेऊ शकतात माणसाचा जीव
बॉलीवूडची बेबो तिसऱ्यांदा बनणार आई?; वाढलेलं पोट लपवतेय,पण फोटो व्हायरल
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांनी काय म्हंटलंय?