मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (sanjay raut angry navneet rana)
नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर भाजप नेते महाविकास आघाडीवर आक्रमक झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी नेतेही भाजपवर टीका करत आहे. आता भाजप नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
हनुमान चालिसा म्हणायला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच नाही. काल ते जेलमध्ये होते. तिथे ते हनुमान चालिसा वाचू शकत होते. त्यांना आर्थर रोड, भायखळा तुरुंगात नेणार आहे, तिथे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा वाचावी. त्यांनी फडणवीसांच्या घरी जाऊन हनुमान चालिसा वाचावी. एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथं वाचावी, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
तसेच महाराष्ट्रात धार्मिक कार्यक्रमाला कुणीच विरोध केला नाही. पण त्यांचा हट्ट असा आहे की आम्ही मातोश्रीतच घुसून वाचू. मग आम्हीही घुसू. हे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? घुसून वाचेल काय? वाचा ना. तुम्ही तुमच्या घरी आणि मंदिरात पठण करा. इतर धर्मीयही करतात. पण तुमचा हट्ट कशासाठी कुणी खांद्यावर बंदूक ठेवतात आणि बार उडवतात. अर्थात ते बार काही लागत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
राणा प्रकरण असेल, सदावर्ते प्रकरण असेल या मागे भाजप आहे. हे खूप मोठं षड्यंत्र आहे. पोलिसांनी लावलेली कलमं योग्य आहे. धर्माच्या नावावर कुणी असं करु नये. लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं असं करत असेल तर राजद्रोहाचा खटला दाखल होत असतो, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष कायद्या व्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आमच्या अंगावर आले तर आम्ही घरात घुसणारच, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच मुंबई पोलिस काहीही चुकीची कारवाई करत नाहीये, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता जो येतो तो म्हणायला भारतात येतो, पण जातो फक्त गुजरातला; पवारांचा मोदींवर हल्लाबोल
इलेक्ट्रीक बाईक घेणारांनो सावधान! चार्जींगला लावलेल्या बॅटरीचा स्फोट झाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
राज ठाकरेंना सभेची परवानगी मिळो न मिळो, सभा होणारच; केंद्रीय मंत्र्यांचे राज ठाकरेंबद्दल मोठे वक्तव्य