सोमय्यांचा कोट्यावधींचा घोटाळा उघड, संरक्षणाच्या मुद्द्यावर निधी गोळा करून भ्रष्टाचार

भाजप नेते किरीट सोमय्या हे सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येतात. पण आता ते स्वत: एका अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आता किरीट सोमय्यांवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहे. (sanjay raut allegation on kirit somaiyya)

आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे, असे शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना माहिती आहे. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनेही कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाइल्स उघड केली आहे. याप्रकरणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते, पण त्यांनी तो जमा केलेला नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कुठलाच निधी न आल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मागील महिन्यात समोर आली, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

आयएनएस भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून निधी जमवला होता. यातून ५७ ते ५८ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराचे प्रमुख किरीट सोमय्या होते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच सोमय्या हे सीए असल्यामुळे त्यांना पैशांचे काय करायचे हे माहित आहे. आता या प्रकरणी आयकर विभागाने, ईडीने, सीबीआयने चौकशी करावी, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. देशातील नागरिकांच्या भावनांशी खेळून देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावर हा निधी जमवण्यात आला पण त्याच्यात भ्रष्टाचार करण्यात आला. त्यामुळे सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
350 वर्षांनंतरही भक्कमपणे उभा आहे शिवरायांनी बांधलेला हा पूल; वैशिष्ट्ये जाणून कराल सलाम
रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालं समज; नितीन गडकरी रोहित पाटलांना असं का म्हणाले?
रणबीर आणि आलियाच्या प्रेमकहाणीचं बालिका वधू कनेक्शन आले समोर, तुम्हाला माहीत आहे का हे सिक्रेट?