Share

‘भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा’

sanjay raut

भाजप आणि शिवसेना मधला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. उद्या शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, या पत्रकार परिषदेला पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले.

याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.’

तसेच ‘एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

राऊत म्हणाले, ‘आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपचे नेते हा नेता जेलमध्ये जाईल, तो नेता अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत असेल, असे म्हणत आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील, असे भाकीत राऊत यांनी केले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप सुरू आहे. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे.

तसेच हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, असे म्हणत राऊत यांनी चांगलाच भाजपचा समाचार घेतला आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असे देखील राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
वाढदिवस विशेष: किशोर कुमार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर खुश नव्हती मधुबाला, वाचा यामागील कारण
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अर्जुन कपूरने मोकळे केले मन; म्हणाला, ‘आमचे आयुष्य नरक झाले होते’
उपोषण मागे घेतल्यानंतर मराठी दिग्दर्शकाने अण्णांना लगावला टोला; म्हणाला, अण्णा जेवायला जेवायला..
शिल्पा शेट्टीसह तिची बहिण आणि आईविरोधात समन्स जारी, तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे कर्ज परत न केल्याचा आरोप

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now