संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांनी आज आपल्या पदाची शपथ आज घेतली. परंतु ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप झाले होते. त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यावेळी भाजपने रान पेटवले होते. (Sanjay Rathore, who caused the death of Pooja Chavan is unfortunate to be given post )
आता मात्र एकनाथ शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार असतानाही त्यांना मंत्रीपद देण्यात आले. मात्र भाजपच्याच चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘पूजा चव्हाण मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं दुर्दैवी आहे.’
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘संजय राठोड आता मंत्री झाला असला तरी त्याच्या विरोधातील लढा मी सुरूच ठेवलेला आहे.’ अशाप्रकारे बोलत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा एकदा प्रखर भूमिका घेतली आहे.
चित्रा वाघ पुढे असंही म्हणाल्या की, ‘माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, लढेंगे.. जितेंगे!’ या शब्दातून चित्रा वाघ यांनी संजय राठोड विरोधात लढा कायम ठेवण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासंदर्भात प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे दिसते.
युट्युब स्टार पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये मृत्यू झाला होता. तिची हत्या की आत्महत्या? यावरती अनेक उलट सुलट चर्चा तेव्हा झाल्या. त्यादरम्यान त्याचा थेट संबंध सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडला गेला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला संजय राठोड जबाबदार असल्याचे बोलले गेले. त्यामुळे संजय राठोड यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता चित्रा वाघ यांनी पुन्हा त्या प्रकरणाचा विषय काढत संजय राठोडांसाठी भाजपकडूनच मोठी अडचण नकळत निर्माण केल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
Bacchu Kadu: ‘आमच्याशिवाय सरकार चालू शकत नाही..’; मंत्रीपद नाकारल्यानंतर बच्चू कडूंनी थोपटले दंड
TET परीक्षेत अपात्र असतानाही अब्दुल सत्तारांच्या मुलीला २०१७ पासून मिळतोय सरकारी पगार
Pradip Patwardhan Died : दिग्गज मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अकाली निधन; मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा