Share

..त्यामुळे फडणवीसांनी जाहीर माफी मागावी, संजय राठोडांना क्लिन चिट मिळताच राष्ट्रवादी आक्रमक

devendra fadanvis

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलच गाजलं होतं. त्या प्रकरणात चर्चेत आले ठाकरे सरकारमधील संजय राठोड. मागील वर्षी संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चांगलेच अडकले होते. त्या प्रकरणावरून राजकारण देखील चांगलच रंगल होतं. भाजपने त्यांच्यावर सडकून टिका देखील केली होती.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांचं प्रकरण चांगलच लावून धरलं होतं. भाजपने अनेक आंदोलन देखील त्यांच्या विरोधात केली होती. राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी भाजपचा आग्रह होता. अखेर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मात्र आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. अन् नुकतीच त्यांना क्लिनचीट मिळाली असल्याच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी हात जोडून माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, आता राठोड यांना क्लिनचीट मिळाली आहे. यामुळे राठोड यांच्यावर फडणवीस यांनी टिव्हीवर येवून खोटे आरोप केल्याचे मान्य करावे आणि राठोड यांची जाहीर माफी मागावी. खोटे आरोप केले होते, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे.’

पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे की, राठोड यांनी हे कृत्य केले नसेल तर पूजा चव्हाणच्या घरी जावून या प्रकरणाचा तपास आम्ही करु तिला न्याय देवू असे फडणवीस यांनी तिच्या कुटूंबियांना आश्वासन द्यावे. नाहीतर आम्ही भाजपचे सरकार आल्यानंतर क्लिनचीट मिळते असं समजू.’

दरम्यान, काल झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार की नाही? याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या व्यक्तव्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’
…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now