मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार आता प्रतिक्रिया देत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चेत आले आहेत. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आमदार राठोड हे काल आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी राठोड यांचे यवतमाळमध्ये जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. बोलताना राठोड यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. याचबरोबर राठोड यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष केलं आहे.
यावेळी बोलताना राठोड यांनी राऊत यांना लक्ष करत म्हंटलं आहे की, पक्षातील उठावानंतर सर्वांचाच उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असं म्हणतत्यांनी राऊतांना लक्ष्य केलं.
पुढे बोलताना राठोड यांनी म्हंटलं आहे की, आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान आमदार संजय राठोड यांनी केले आहे.
दरम्यान, शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत बोलताना राठोड यांनी म्हंटलं आहे की, काही दिवसांपासून शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदार उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगत होते. मात्र आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही.’
याच कारणामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असं राठोड यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’; महिला शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना इशारा
‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’, महिला शिवसैनिक बंडखोरांविरोधात आक्रमक
मुले खायला मागतील म्हणून झोपूनच ठेवतात पालक, महागाईमुळे ‘या’ देशात बिकट परिस्थिती