Share

“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहे”

devendra fadnvis and uddhav thakare

राज्यातील सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. (sanjay kute shocking statement on devendra fadanvis)

तसेच उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचेही म्हटले जात आहे. पण फडणवीसांनी स्वत:हून मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला आहे, असे भाजपचे काही नेते म्हणताना दिसून येत आहे. आता भाजपचे आमदार संजय कुटे यांनी यावर एक वक्तव्य केले आहे.

राज्यातील सत्तांतराचे खरे सुत्रधार देवेंद्र फडणवीस हेच आहे, असा खुलासा संजय कुटे यांनी केला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदारही देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असेही संजय कुटे यांनी म्हटले आहे. संजय कुटे यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्ता नाट्य होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सुत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळे भाजपमधले काही लोक नाराज झाले असतील. पण फडणवीसांसारखा त्याग करणारा नेता महाराष्ट्राला मिळाला याच आम्ही भाग्य समजतो, असे संजय कुटे यांनी म्हटले आहे.

तसेच सत्तेसाठी भाजपने हे केलेले नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतोय त्याला महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांमध्ये तडा दिला होता. यामुळे हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत चालले होते. २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं. तेच सरकार पुन्हा यावं म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला, असा दावा संजय कुटे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं की मंत्रिमंडळात राहणार नाही. ते २०२४ च्या निवडणूकीसाठी तयारी करणार होते. पण भाजपच्या खासदार, आमदारांनी तक्रार केली त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने याबाबत आदेश दिले. त्यामुळे फडणवीसांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हे पद स्वीकारावं लागलं, असा दावा संजय कुटे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री असलेल्या बंडखोराला शिंदे सरकारमध्ये डच्चू; पहा कुणाला मिळणार संधी
‘बंडखोरीचे किती पैसे घेतले’ म्हणताच अब्दूल सत्तार भडकले, तरूणाला केली शिवीगाळ
उद्धव ठाकरेंचा दुबईतील राईट हॅंड; भाजप नेत्याने नाव फोडत अख्खी कुंडलीच समोर आणली

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now