महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. तसेच सत्ताधारीही भाजप नेत्यांवर वेगवेगळे आरोप करताना दिसून येत आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयांकडून काही विशिष्ट पक्ष आणि काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच दिलासा मिळत आहे, असे म्हटले होते. (sanjay kute shocking statement)
आता संजय राऊतांना उत्तर देताना जळगाव जामोद-शेगावचे आमदार संजय कुटेंनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. आमच्याविरोधात शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा कितीही वापरल्या, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे, असे संजय कुटे यांनी म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका ठराविक पक्षाच्या नेत्यांनाच कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर कुटेंनी कोर्टाबद्दल प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले असून उलट-सुलट चर्चाही सुरु झाल्या आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यावरुन भाजप आमदार संजय कुटेंनी पोलिसांना धारेवर धरलं. पोलिसच कायद्या दुरुपयोग करुन शांतता बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच पोलिस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरली, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टात न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करु. कोर्टातून बऱ्याच गोष्टी आम्हाला करता येतात, असेही संजय कुटे यांनी म्हटले आहे.
संजय कुटेंच्या या व्यक्तव्यावरुन आता संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयांकडून विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. हा दिलासा घोटाळा असल्याचं मी आधीच म्हटलं आहे. आता फडणवीसांचे उजवे हात मानले जाणारे आमदार संजय कुटे यांचं विधान त्याचीच पुष्टी करणारं आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज’, पोलिस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंनी दिल्या मोठमोठ्याने घोषणा
ब्रेकिंग! उदयनराजेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, सदावर्तेंचा मुक्काम पोलिस कोठडीतच
भोंग्यांवर बोलताना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना डिचवलं, म्हणाले, भोंगे लावले, तर…