Share

ठाकरेंना आणखी एक जबर धक्का! खासदारांनी धरली शिंदे गटाची वाट; थेट मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरात दाखल

uddhav thackeray

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे एक – दोन नव्हे तर तब्बल शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

तर आता शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. नुकतीच शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाली असून त्यामध्ये या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी 8 खासदार उपस्थित होते.

शिंदे गटामध्ये एकूण शिवसेनेचे 15 खासदार सामील होतील अशी शक्यता वर्तवली जातं आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव हे देखील शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याच वृत्त समोर आलं आहे. यामुळे परभणीत देखील शिवसेना खिंडार पडल्याच पाहायला मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे, जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. मात्र हा केवळ योगायोग असल्याची माहिती जाधव यांच्याकडून समोर येत आहे. यामुळे नक्की जाधव उद्धव ठाकरेंसोबत आहेत की शिंदे गटासोबत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, असा आरोप त्यावेळी जाधव यांनी केला होता. यामुळे जाधव पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याच बोललं जातं आहे.

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यावर शिंदेंशी जुळवून घेण्याची आमदारांपाठोपाठ खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केली होती. त्याचबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली होती. मात्र खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यामुळे फडणवीसांनी जाहीर माफी मागावी, संजय राठोडांना क्लिन चिट मिळताच राष्ट्रवादी आक्रमक
पुण्यात शिवसेना भलमोठं भगदाड! पंढरपूरला जाता जाता मुख्यमंत्र्यांनी दिला जबर धक्का
रवींद्र जडेजाने CSK ला ठोकला रामराम? केले असं काही की चाहत्यांनाही बसला धक्का
आषाढीची महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते होणार; निवडणूक आयोगाने दिली ‘या’ अटींसह परवानगी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now