Share

तो पक्का हनुमान भक्त होता, रात्री दोनला उठायचा अन्..; अधिकाऱ्याने सांगितला संजूबाबाचा येरवड्यातला किस्सा

प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण करणार संजय दत्त नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. (sanjay dutt yeravada jail incident)

संजय दत्त हा त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे. त्याचे अफेअर्स असो वा त्याची जेलवारी त्याच्या अनेक गोष्टींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती, त्यासाठी त्याला जेलमध्ये सुद्धा रहावे लागले होते.

जेलचेही संजय दत्तचे अनेक किस्से आहेत. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये संजय दत्तचा एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये संजय दत्त रात्री उठून अचानक हनुमान मंत्र म्हणायला लागला होता.

हा किस्सा पोलिस अधिकाऱ्याने त्यांना सांगितला आहे. संज दत्त येरावड्याच्या जेलमध्ये होता, तेव्हा त्यांची तिथेच पोस्टिंग झाली होती. योजना यादव एकदा सांगलीवरुन पुण्याला यायला निघाल्या होत्या. ऑफिससाठी त्यांना पहाटेची बस पकडायची होती. त्यांचा भाऊ त्यांना बस स्टॉपर्यंत सोडवण्यासाठी निघाला होता. पण शेजारच्या अपार्टमेंटमधून पोलिस अधिकारी पार्किंगमधून जाताना दिसले. त्यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली.

घरापासून ऑफिसपर्यंतचे अंतर लांब असल्यामुळे त्यांच्यात चांगलाच संवाद रंगला. योजना यांना समजलं की तीन वर्षांपूर्वीच त्यांची बदली सांगलीला झाली. आधी ते येरावड्याला होते. योजनाही येरावड्याला काही वेळा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाऊन आल्या होत्या. त्यामुळे तिथे त्यांची ओळख होती.

अशात त्यांच्या त संजय दत्तचा विषय आला. योजना यांनी त्या अधिकाऱ्याला संजय दत्त होता, तेव्हा तुम्ही तिथेच होता का असं विचारलं. तेव्हा त्यांनी हो असं उत्तर दिलं आणि संजू बाबाचा एक किस्सा सांगण्यास सुरुवात केली. तो किस्सा ऐकून योजनाही हैराण झाल्या.

ते म्हणाले, हिरो बिरो बाहेरच्या माणसासाठी. येरावड्यात सगळे सारखेच असतात. संजू बाबाही तसाच होता. त्यानेही तिथलं सर्व स्वीकारलं होतं. तो पक्का हनुमान भक्त होता. रात्री दोन उठायचा तर थेट सकाळी सहापर्यंत हनुमान मंत्र म्हणायचा. त्याच्या पूजेत त्याने कधीच खंड पडू दिला नाही.

तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत त्याला काही सूट नव्हती. तुरुंगातल्या कामाचे साडे चारशे रुपये त्याला मिळायचे. काही कैदी त्यातनं फळ किंवा आणखी काही गोष्टी खायला घ्यायचा. पण संजू बाबाने असं कधीच केलं नाही. तो सगळ्या पैशांच्या सिगारेट घ्यायचा आणि त्या प्यायचा. सिगारेट नाही मिळाली, तर बिड्या फुकायचा, असा हा किस्सा योजना यांना मिळालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यसभा निवडणूक! विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट; भाजपने ‘या’ चेहऱ्यांना दिली संधी
‘…यामुळे मी गांजा ओढायचो’; आर्यन खानची एनसीबी समोर कबुली
मोठी बातमी! प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाची गोळी मारुन हत्या

ताज्या बातम्या बाॅलीवुड राज्य

Join WhatsApp

Join Now