Share

आई मी सुट्टीवर येतोय…जवानाचे शब्द ठरले अखेरचे; नरळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

जवान हे आपला जीव मुठीत घेऊन आपल्या देशाची रक्षा करत असतात. जवानांना कित्येक महिने आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. अनेकदा हल्ल्यांमध्ये जवानांना आपला जीव गमावावा लागतो. अशात पश्चिम बंगालमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. (sangali army man death)

सांगलीतील मिरज तालुक्यातील कुपवाडा येथील रविंद्र नारायण नरळे या जवानाचे पश्चिम बंगालमध्ये निधन झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पाणागड येथे सेवा बजावताना अकस्मात निधन झाले आहे. नरळे आर्मी मेडीकल कोअर १८९ हॉस्पिटल पाणागड येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते.

रविंद्र नरळे हे मूळ गोंधळेवाडीतील होते. तिथे कुपवाड येथील अहिल्यानगर, न्यु विजयनगर कुपवाडा भागाचे ते रहिवासी होते. कारखाना परीसरातील शांतीनिकेतन विद्यालयामध्ये त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर२००५ साली ते सैन्यात भरती झाले होते.

रविंद्र नरळे हे पश्चिम बंगालमधील पाणागड येथे सेवा बजावत होते. त्याचवेळी त्यांचे अकस्मात निधन झाले आहे. रविवारी नरळे यांच्या कुटूंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. रविंद्र नरळे यांच्या निधनामुळे नरळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

निधन झालेल्या रविंद्र नरळे यांनी शनिवारीच आपल्या आईशी फोनवरुन बोलणे केले होते. त्यावेळी त्यांनी आपण लवकरच सुट्टीवर येणार असल्याचे सांगितले होते. आई मी लवकरच सुट्टीवर येणार आहे. तु काळजी करु नकोस. सांगलीला येताना गाडीमध्ये बसताना मी फोन करेन, असे त्यांचे आईसोबतचे शेवटचे शब्द होते.

मुलगा लवकरच भेटणार होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मुलाच्या निधनामुळे आईला मोठा धक्का बसला आहे. रविंद्र नरळे यांचे पार्थिव पाणागडहून पाठवण्यात आलं असून मंगळवारी अंत्यविधीसाठी ते सांगलीत दाखल होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिच्या बांगड्या फोडू नका, तिचं मंगळसूत्रही काढू नका अन् तिचं कुंकूही पुसू नका; चाकणकरांनी जिंकलं मन
राजनाथ सिंह यांना गडकरींच्या नातवाने केला साष्टांग नमस्कार, संस्कार पाहून सगळ्यांनी केले कौतुक
५ वर्षांनी तारक मेहता’मध्ये पुन्हा दिसणार जुनी दयाबेन; निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now