एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण चांगली जागा शोधतो. त्या जागेसाठी हवे तितके पैसे देखील मोजतो. मात्र गुजरात मधल्या एका तरुणाने व्यवसायासाठी पत्र्याची जागा घेतली आणि त्यातून हवी तितकी कमाई देखील केली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र या तरुणाने पत्र्याच्या जागेत काम करून तब्बल ४०० कोटींची कमाई केली आहे.
हरियाणामधील संदीप गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. लोक त्याला सँडी या नावाने ओळखतात. याशिवाय विविध राज्यांमध्ये तेल चोरीचे नेटवर्क चालविणारा माफिया म्हणून त्याची ओळख आहे. संदीपने 2006 मध्ये दक्षिण गुजरातमध्ये आपला काळा धंदा सुरू केला होता. फर्निश ऑइल खरेदीच्या या धंद्यात त्याची तेल चोरांशी ओळख झाली. यानंतर त्याने इंडियन ऑइल आणि ओएनजीसीची पाइपलाइन असणाऱ्या ठिकाणी पत्र्याचे शेड भाड्याने घ्यायला लागला.
यातून त्याने तेलचोरीचे रॅकेट चालवायला सुरुवात केली. यामध्ये पत्र्याचा शेड भाड्याने घेतल्यानंतर संदीप गुप्ता आणि त्याच्या टोळीचे लोक पाइपलाइनला छेद देऊन, ते तेल गुप्त पाइपलाइनद्वारे आपल्या शेडपर्यंत पोहोचवत असतं. दरम्यान त्याने अनेक ठिकाणी तेल चोरीचे रॅकेट तयार करत कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यात त्याने तेल चोरी केलेली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप तेलाचे ड्रम भरून विविध कारखाने, वीटभट्ट्यांना टँकरऐवजी कंटेनरमधून तेल विकून संदीप मालामाल झाला आहे. यामधून त्याने आतापर्यंत तब्बल ४०० कोटींची तेलचोरी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून पोलीस संदीप गुप्ताच्या शोधात होते. त्याच्यावर आजपर्यंत 20 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून याआधी देखील संदीपला अटक करण्यात आली होती. मात्र तो फरार झाला होता. दरम्यान सुरतच्या गुन्हे शाखेने नुकतीच त्याला कोलकत्ता येथून अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या