गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अखेर ठाकरे सरकार कोसळले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन नवीन सरकार स्थापन केले आहे. (sandipaan bhumre audi clip viral)
गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात बंडखोरी करणारे आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री राहिलेले संदीपान भुमरे चांगलेच चर्चेत आले आहे.
संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यासोबत बोलताना दिसून येत आहे. कार्यकर्त्याने भुमरे यांचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. तेव्हा भुमरे त्याला चांगल्या पोस्ट करण्यासाठी सांगत असल्याचे क्लिपमध्ये लक्षात येते.
फोन कॉलमध्ये भुमरे आपल्या कार्यकर्त्याला आता चांगल्या पोस्ट टाक, सगळीकडे फिरीव, मिरच्या झोंबल्या पाहिजेत, असे म्हणताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिपमध्ये सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी भुमरेंना ट्रोलही केले आहे.
सध्या भुमरे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. भुमरे यांची ही ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणारे संदीपान भुमरे हे पाचवेळा आमदार झालेले आहे. तसेच त्यांना मंत्रीपदही मिळाले होते. असे असतानाही त्यांनी बंडखोरी केली आहे.
दरम्यान, संदीपान भुमरे हे आधी साखर कारखान्याचे स्लीपबॉय होते, पण शिवसेनेमुळे ते त्याच कारखान्याचे चेअरमन झाले. पण त्यांनी शिवसेनेशीच बंड केल्यामुळे शिवसैनिक भडकले आहे. भुमरे साहेबांना शिवसेनेने काय कमी पडू दिले? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या ‘या’ आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली केराची टोपली; वाचा नेमकं काय घडलं
तब्बल अकरा दिवसांनी बंडखोरांचे मुंबईत आगमन; ‘अशी’ असेल पुढील राजकीय रणनीती
नव्या सरकारविरोधात मनसे मैदानात! पहील्याच निर्णयाला विरोध करत ठाकरे म्हणाले…