Share

जबरदस्त प्रमोशन, मंदिरात अभिषेकही केला, तरी ‘पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर पडला; पहा किती केली कमाई?

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना आणि प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या, पण पहिल्यादिवशीची कमाई पाहून त्याने अपेक्षा पुर्ण न केल्याचे दिसून येते. भारताचा एक शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाची कथा सम्राट पृथ्वीराजमध्ये दाखवण्यात आली आहे. (samrat prithviraj box office collection)

तसेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचाही खुलासा करण्यात आला आहे. विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, सम्राट पृथ्वीराजने आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीइतकीच कमाई केली आहे. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे.

सम्राट पृथ्वीराजने पहिल्याच दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या आधीच्या बच्चन पांडे या चित्रपटाच्या ओपनिंग डेच्या कलेक्शनपेक्षा ही कमी आहे. बच्चन पांडेने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १३ कोटींची कमाई केली होती.

सम्राट पृथ्वीराजचे बजेट पाहता पहिल्याच दिवशी १६ कोटींच्या वर कमाई होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. काही शहरांमध्ये हा चित्रपट करमुक्त नसता, तर त्याची कमी कमाई अजून कमी झाली असती.चित्रपटाचा ट्रेलर पाहता, त्याची प्रमोशन पद्धत पाहता पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर कमाल करणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

सम्राट पृथ्वीराज चित्रपट ४९५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा ताबडतोड कमाई करणार असे म्हटले जात होते. पण तसे झाले नाही आणि या चित्रपटाने फक्त १० कोटींची कमाई केली. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. असे असतानाही हा चित्रपटाला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अक्षय कुमारचा बच्चन पांडे, बेल बॉटम हे दोन्ही चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप ठरले. त्यानंतर पृथ्वीराजमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती, पण ती अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे हा चित्रपटही निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
स्वतःवर प्रेम करण्यासाठी स्वतःशीच लग्न; भाजपने केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हटलंय?
जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?
भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली; संजय राऊत स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now